
बेळगाव : अंजनेय नगर येथील आणि एन.के. एज्युकेशन फाउंडेशन कॉलेजचा विद्यार्थी अविनाश कोरे याने नुकत्याच पदवीपूर्व शिक्षण मंडळाद्वारे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अविनाशने आपल्या दमदार प्रदर्शनातून ५० मी. बटरफ्लाय, १०० मी. बटरफ्लाय आणि २०० मी. बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांमध्ये रौप्यपदक पटकावले.
तसेच संघस्पर्धांमध्येही त्याने उजवी कामगिरी करत ४×१०० मी. फ्रीस्टाईल रिले मध्ये रौप्यपदक आणि ४×१०० मी. मेडले रिले मध्ये सुवर्णपदक जिंकत आपल्या संघाचा मान वाढवला.
या उल्लेखनीय यशामुळे अविनाशची एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि सहाध्यायींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta