Tuesday , March 3 2026
Breaking News

म. ए. समिती नेत्यांवर एफआयआर; परवानगीविना मूक सायकल फेरी काढल्याचा ठपका

Spread the love

बेळगाव : सीमाप्रश्नी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या म. ए. समितीच्या १५० हून अधिक नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलीस स्थानकात सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून सायकल फेरीत सहभागी झालेल्या नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

१ नोव्हेंबर रोजी मूक फेरीच्या माध्यमातून मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकात सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध फेरीत सहभागी होऊन लढा दिला होता. शनिवारी सकाळी महाद्वार रोड येथील छत्रपती संभाजी उद्यानातून फेरीला सुरुवात झाली होती.

मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. काळ्यादिनाच्या पार्श्वभूमीवर मूक सायकल फेरी काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही छत्रपती संभाजी उद्यान परिसरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून नागरिकांच्या ये-जा करणाऱ्या मार्गावर अडथळा निर्माण करून उपद्रव केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

फेरीत कर्नाटक सरकार व कन्नडिगांच्या भावनेला धक्का पोहोचवणाऱ्या घोषणा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाजूने भाषणे व घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शांततेला भंग पोहोचला आहे. बेळगावसह सीमाभागातील इतर गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे सांगत सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एकूण १०० ते १५० जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८९(२), १९२, २९२, २९३, २८५, १९० अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी : मनोहर कल्लप्पा किणेकर (हिंडलगा, बेळगाव), मालोजी अष्टेकर (कंग्राळ गल्ली), प्रकाश अप्पाजी मरगाळे (पाटील मळा, शिवभवनजवळ, बेळगाव), शुभम विक्रांत शेळके (महांतेशनगर, बेळगाव), रमाकांत जयवंत कोंडुसकर (गांधीनगर, बेळगाव), रणजित राजाराम चव्हाण-पाटील (पाटील गल्ली, बेळगाव), अमर किशन येळूरकर (रा. चव्हाट गल्ली), गजानन मल्लाप्पा पाटील (रा. ताशिलदार गल्ली), नेताजी नारायण जाधव (रा. शहापूर), अंकुश अरविंद केसरकर (चव्हाण गल्ली, बेळगाव), मदन बाबूराव बामणे (रा. हिंदवाडी), प्रशांत मनोहर भातकांडे (रा. होसूर बसवण गल्ली), जयेश सुरेश भातकांडे (रा. कुंतिनगर, खासबाग), महेश केशव नाईक (रा. हट्टीहोळी), किरण गोविंद गावडे (रा. सोमवार पेठ, टिळकवाडी), रेणू सुहास किल्लेकर (रा. शास्त्रीनगर गोडसे रोड, बेळगाव), सरिता विराज पाटील (टिळक चौक, बेळगाव), किरण प्रकाश हुद्दार (बसव सर्कल, शहापूर), श्रीकांत बाळकृष्ण कदम (नाथ पै सर्कल, शहापूर), चंद्रकांत जयवंत कोंडुसकर (गांधीनगर, बेळगाव), संतोष गंगाराम कृष्णाचे (वंटमुरी कॉलनी, बेळगाव), गुंडू कृष्णा कदम (आनंदवाडी, शहापूर), हनमंत शतप्पा मजूकर (देसूर बेळगाव), प्रकाश रामचंद्र शिरोळकर (कोनवाळ गल्ली, बेळगाव), शिवाजी पुंडलिक मंडोळकर (शिवाजीनगर पाचवा क्रॉस, बेळगाव), महेश रामचंद्र बिर्जे (शास्त्रीनगर, तिसरा क्रॉस, बेळगाव), सुहास प्रकाश हुद्दार (खासबाग बसव सर्कल, बेळगाव), उमेश बाळू कुऱ्याळकर राजहंस गल्ली बेळगाव), जोतिबा गजानन पालेकर (जोशी गल्ली शहापूर), बाबूराव परशुराम केरवाडकर (मंगाईनगर बेळगाव), विश्वजित अरुण चौगुले (खडक गल्ली बेळगाव), विशाल सिद्धार्थ भातकांडे (भांदुर गल्ली, बेळगाव), निहाल राजाराम शहापूरकर (भातकांडे गल्ली बेळगाव), विठ्ठल भावकांना पाटील (गणपत गल्ली बेळगाव) येल्लारी कृष्णा बिडकर (कामत गल्ली) यांच्यासह आणखी शंभर ते दीडशे जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *