
बेळगाव: बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवी गुरुनाथ किरमिटे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी किरमिटे यांनी सामाजिक विषयांवर भाष्य करणा-या कविता व चारोळ्या सादर केल्या. त्यानी सादर केलेली
मरता केव्हाही येते
थोडे जगता आले पाहिजे
ही कविता दाद घेऊन गेली.
यावेळी श्रीकृष्ण खानोलकर यांनी नाट्यगीत, औदुंबर शेट्ये यांनी अभंग, चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता तर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, सदाशिव व गिरिजा कुलकर्णी, विजय वाईगडे, प्रकाश कुडतरकर, जगमोहन अगरवाल, सुरेन्द्र देसाई, शोभा हतरकी यांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.
सभासदांनी केलेल्या आग्रहामुळे यापुढे दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम होईल याची सभासदांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta