
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज डी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी प्राध्यापक डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षाची रूपरेषा समजावून सांगीतली त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डी. फार्मासी या अभ्यसक्रमाचं महत्व आणि त्यापासून मिळणाऱ्या नोकरी- व्यवसायाच्या त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या संधी या बाबत कॉलेजचे उप-प्राचार्य डॉ. नागेश सी. यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कॉलेजच्या शिक्षकवर्गाची तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख डॉ. देविका कोटेकर यांनी करून दिली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयवीणा मँडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन आरजू बी. जमादार मँडम यांनी केले.
या प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती राजश्री नागराजू यांनी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta