Wednesday , March 4 2026
Breaking News

बसुर्ते गावातील धरण विस्थापितांच्या मागण्या पूर्ण करणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Spread the love

 

बेळगाव : बसुर्ते गावच्या ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्या लोकांची जमीन धरण प्रकल्पात गेली आहे त्यांना जमिनीच्या मोबदल्यात जमीन किंवा नुकसान भरपाईची योग्य ती रक्कम मिळाल्याशिवाय धरणाचे काम करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि धरण प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. या बैठकीला शेतकरी ग्रामस्थ स्थानिक नेते व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *