
बेळगाव : बेळगाव शहरात रस्त्यालगत अनेक ठिकाणी वाहने बेवारस स्थितीत उभी केलेली आढळून येत आहेत. या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने शहर पोलिसांनी यावर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस वाहनांना उचलून पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार आहे. जेणेकरून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही व शहरातील रस्ते मोकळे होतील. बेळगाव मधील नागरिकांना शहर पोलिसांचे आवाहन आहे की, त्यांनी आपल्या परिसरात रस्त्याकडेला बेवारस स्थितीत उभी केलेल्या वाहनांची छायाचित्रे काढून शहर पोलिसांच्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित करावीत. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर शहर पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि रस्त्यावरील जागा रिकाम्या करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करू शकते असे शहर पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta