
बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. जि. बेळगाव) गावाच्या हद्दीतील खुल्या जागेत जुगारी अड्ड्यावर मंगळवारी मध्यरात्री 3.30 वाजता बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 10 जुगाऱ्यांना अटक केली. तसेच 53600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेले संतोष परमार (रा. नानावाडी, बेळगाव),
सुरेश अनगोळकर (रा. पाटील गल्ली, बेळगाव), बाबू रामाप्पा दोडमणी (रा. मार्केट चौधरी गेट, दांडेली जि. कारवार), बसवराज भीमराव शिगीहळ्ळी (रा. ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी, बेळगाव), हिदायतुल्ला असीम मकानदार (रा. आंबेडकर गल्ली, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र), आनंद भरमकुमार कस्तुरी (रा. रविवार पेठ, गोकाक, जि. बेळगाव), तौफिक मोहम्मदगौस पाकीर (रा. सुभाषनगर अब्बास गल्ली, दांडेली जि. कारवार), अलिसाब अन्वर मसनकट्टी (रा. मारुतीनगर, दांडेली जि. कारवार), मलिक निजामसाब गुडावले (रा. रविवार पेठ, गोकाक, जि. बेळगाव), तवणप्पा पद्मप्पा बेंन्नाळी (रा. रविवार पेठ गोकाक, जि. बेळगाव)
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta