
बेळगाव : नाथ पै. चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात आज बुधवारी श्री काळभैरवनाथ जयंती भक्तिभावात साजरी करण्यात आली. श्री काळभैरवनाथ जयंती निमित्त काल मंगळवारी सायंकाळी होम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आज शनिवारी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी बारा वाजता महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात झाली महाप्रसादाला शहापूर, खासबाग, वडगाव, बेळगाव शहरातील हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शविली.

सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री काळभैरव जयंती निमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली. त्याचबरोबर मंदिरात गाभाऱ्यात मुलांचे आकर्षक अभ्यास करण्यात आली. श्री काळभैरवनाथ दर्शनासाठी भाविकांनी आज मंदिरात मोठी गर्दी केली होती. श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यासाठी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta