
बेळगाव : पुणे येथील स्विफ्टनलिफ्ट मीडिया ग्रुपतर्फे आयोजित ‘भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५’ वितरण कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऊर्मिला कोठारे उपस्थित होत्या. लोकरीच्या विणकामात अभिनव डिझाईन, कल्पनांची आणि निटवेअर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन आशा पत्रावळी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन स्विफ्टनलिफ्ट मीडियाचे सीईओ नीलेश साबे, सीनियर मैनेजर आरती गंडलेवर, टीम लीडर प्रथम पटेल, आदित्य मेश्राम यांनी केले होते.
आशा पत्रावळी यांनी लोकरीच्या विणकामात उल्लेखनीय कामागिरी बजावली असून या विषयावरील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना विणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta