
बेळगाव : शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमी आज गुरुवारी भारतमाता महिला मंडळ आणि मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. आजही गुरुवारी सायंकाळी मुक्तीधामातील श्री महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महादेव मंदिर दिव्यांनी झळाळून गेले. श्रीबसवराज राजेंद्र रावळ योगी महाराज यांच्या समाधीस्थळी ही दिवे लावण्यात आले. उपस्थित महिला भगिनींनी पूजा, आरती आणि प्रसाद वाटप केले.
यमुना पेटकर, वंदना मुचंडी, लक्ष्मी काकतीकर, रेणु काकतीकर, वैष्णवी काकतीकर यांच्यासह अन्य सदस्य आणि भक्त यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta