बेळगाव : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यासोबतच इच्छुकांची यादीही वाढत चालली आहे. आता तर बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनीही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला आहे. बेळगावातील सरदार्स हायस्कूलमध्ये सोमवारी एसएसएलसी परीक्षार्थींचे स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके यांनी सांगितले की, मंत्रिमंडळात मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. ते मिळाले पाहिजे. मीसुद्धा मराठा समाजाचा आहे, मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. मला मंत्रिपद देणे न देणे हा विषय वरिष्ठांचा आहे. मंत्रिपदासाठी मी राजीनामा देणार नाही. पक्षनेतृत्वावर माझा विश्वास आहे.
गेल्या 8-10 दिवसांपासून बेळगावात पाणी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी अधिवेशन सोडून आज शहरात थांबलो आहे. एल अँड टी कंपनीचे अधिकारी-कर्मचारी नीट काम करत नाहीत. व्हॉल्वमन्सना आधी काढून टाकले होते. आता अनुभवी व्हॉल्वमन्सना पुन्हा कामावर घेतले आहे. आज त्यांची सभा घेऊन कोणत्याही परिस्थितीत पाणी समस्या आजच्याआजच सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आ. बेनके यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी भगवा ध्वज फाडून टाकल्यावरून त्यांना हिंदूंबद्दल किती द्वेष आहे हे दिसून येते. हिजाब प्रकरणावरूनही ते असेच राजकारण करत आहेत. स्वामीजींनी डोक्यावर फेटा बांधणे सामान्य आहे. त्यावरून हिंदू आणि अल्पसंख्यांकांमध्ये फूट पाडण्याचे काम ते करत आहेत. मात्र लोक आता शहाणे झाले आहेत, ते सिद्दरामय्यांना चांगला धडा शिकवतील असे आ. बेनके यांनी सांगितले.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …