
बेळगाव : मरगाई मंदिर भांदुर गल्ली येथे गुरुवार दिनांक ६रोजी सामाजिक समरसता मंच वतीने भगिनी निवेदिता जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.अरुणा काकतकर, प्रमुख वक्त्या स्नेहल कालकुंद्री तसेच विधान परिषद सदस्य व सामाजिक समरसता मंच भारतीय टोळी सदस्य श्री. साबण्णा तलवार आणि संघ प्रांत प्रचारक व सामाजिक समरसता प्रांंत सहसंयोजक श्री. कृष्णमूर्ती उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगिनी निवेदिता यांच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून करण्यात आली. श्री शैल्य मठपती यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. श्री. भुजंग चौगुले यांनी गीत सादर केले सौ. अस्मिता आळतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डी के पार्वती यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या स्नेहल कालकुंद्री यांनी आपल्या भाषणात भगिनी निवेदिता यांचा जीवनप्रवास व त्यांनी भारतभूमीला आपली कर्मभूमी म्हणून जनकल्याणासाठी आपले जीवन कसे समर्पित केले यावर त्या बोलत होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना भगिनी निवेदिता यांच्या विचारांना सोबत घेऊन आपणही थोडे जरी राष्ट्रासाठी जनकल्याणासाठी कार्य करत रहावे असे त्यांनी सांगितले.
श्री. साबण्णा तलवार यांनी उपस्थित महिलांसाठी मार्गदर्शनपर भाषण केले. सौ. अरुणा काकतकर यांनी आपल्या समाजकार्यातील अनुभव यावर भाष्य केले. भगिनी निवेदिता जयंती निमित्त कवयत्री सौ. अस्मिता अळतेकर व कवयत्री सौ. रोशनी हुंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. कु. उज्वला बडवाण्णाचे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून त्यांना सन्मानित केले. श्री. कृष्णमूर्ती यांनी शांती मंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. रोशनी हुंद्रे यांनी केले तसेच आभार कु देवयानी पाटील यांनी मानले. एकंदरीत कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच सामाजिक समरसता मंचचे टोळी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta