Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या माधुरी पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन प्रवासाबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात वेगवेगळे प्रसंग सांगितले. आपल्या जीवनात संयम, कठीण परिस्थिती वेळी तोंड देण्याची हिंमत पंडित जवाहरलाल नेहरूंची होती हेही त्यांनी सांगितले.
इयत्ता तिसरी ‘क’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक धीरजसिंह राजपूत तसेच संगीत शिक्षक सहदेव कांबळे, नारायण गणाचारी यांच्या मार्गदर्शनाने ‘छान छान छान मनी माऊच बाळ’हे गाणे सादर केले. तसेच पंडित जवाहरलाल नेहरूंची भित्तीपत्रके तयार केली. यावेळी खेळ गट ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या खाऊ वर्गात बनवला. यामध्ये चुरमुरे भेळ, पाणीपुरी, स्वीटकॉर्न, फ्राईड राईस, फ्रुट कस्टर्ड, पावभाजी यासारख्या अनेक पदार्थांची चव विद्यार्थ्यांनी चाखली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *