
बेळगाव : वीज विभागाच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बेळगाव दक्षिण विभागासह बेळगाव तालुक्यात उद्या (रविवार, दि. 16) सकाळी 10 ते सायं. 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
हेस्कॉमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्य लाईनचे बळकटीकरण, दुरुस्त्या, ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स, झाडांच्या फांद्या कापणे, उपकरणांची तपासणी या कारणास्तव वीजपुरवठा ठप्प करण्यात येणार आहे.
वीजपुरवठा खालील परिसरात बंद राहणार
राणी चन्नमानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे फाटक, उद्यमबाग औद्योगिक वसाहत, अनगोळ परिसर, यरमाळ क्रॉस, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, आरसीनगर दुसरा स्टॉप, पार्वती नगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, नित्यानंद कॉलनी, जैतनमाळ, संपूर्ण अनगोळ, चिदंबरनगर, मृत्युंजय नगर, खानापूर रोड, दुसरे रेल्वे फाटक, संपूर्ण टिळकवाडी, संत रोहिदासनगर, मजगाव, कल्लेश्वरनगर, ब्रम्हनगर, संत ज्ञानेश्वर नगर, विष्णू गल्ली, धामणे रोड, कल्लेश्वर रोड, देवांगनगर पहिला व दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, वड्डर छावणी, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, भाग्यनगर, आनंदवाडी परिसर, वडगाव मेन रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, संभाजीनगर, केशव नगर, येळ्ळूर केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, घुमटमाळ, नाथपैसर्कल,जेल शाळा, गोमटेश शाळा परिसरात रविवारी दिवसभर वीजपुरवठा ठप्प होणार आहे.
बेळगाव तालुक्यात बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप्प, कुद्रेमानी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसुर्ते, बेक्किनकेरी. सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी कॉलेज, गणेशपुर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट, हिंडलगा पंप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, शिवमनगर, गोजगा आणि आंबेवाडी, अवचारट्टी, यरमाळ रोड, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदीहळ्ळी, कोंडूसकोप्प या गावातही रविवारी दिवसभर वीज नसेल. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta