Wednesday , March 4 2026
Breaking News

१३ जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : म्हैसूर येथे ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब व अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी अभूतपूर्व यश मिळवत ९ सुवर्ण, १४ रौप्य व १९ कांस्य असे ४२ पदके जिंकली. या चमकदार कामगिरीच्या बळावर १३ जलतरणपटूंची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशासाठी स्विम गुरु उमेश कालघाटगी तसेच प्रशिक्षक अक्षय शेरगार, अजिंक्य मेंडक, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर व इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. जलतरणपटूंनी सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे जयंंत हुंबरवाडी व अन्य मान्यवरांचे आभार मानले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *