Tuesday , March 3 2026
Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे बेळगावात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे सर्किट हाऊस, बेळगाव येथे कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन हा मेळावा विशेषतः आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मोरे यांनी पक्षाच्या विचारधारेवर प्रकाश टाकत सांगितले की, “शरद पवार साहेबांनी राज्य आणि केंद्रस्तरावर सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी जे शाश्वत धोरणे राबविली, त्याला पर्याय आजपर्यंत कोणत्याही पक्षाने दिलेला नाही. कृषिमंत्री म्हणून त्यांनी 73 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. असा नेता ना आधी झाला, ना पुढे होणार.”

ते पुढे म्हणाले की, “आपल्या पक्षाने कधीही फोडाफोडीची किंवा कार्यकर्ते पळवण्याची राजनीति केली नाही. उलट पक्ष संघटन बळकट करून तळागाळातील लोकांपर्यंत योग्य धोरणे पोहोचवणे हे राष्ट्रवादीचे बाळकडू आहे.”

आगामी निवडणुकांसंदर्भात मोरे यांनी आशावाद व्यक्त करताना सांगितले की, “कर्नाटकासह बेळगाव जिल्ह्यातून अनेक उत्साही आणि सक्षम उमेदवार पक्षात दाखल होत आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उतरून पवार साहेबांच्या विचारांचे पोहोचपावते तळागाळापर्यंत करणार आहे.”

या सुसंवाद मेळाव्यास बेळगाव जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, दुर्गेश मैत्री, जिल्हा सचिव महांतेश कोळूचे, राजदील जमादार, प्रतिभा भालेकर, अल्ताफ सनदी, सोहेल कित्तूर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. स्थानिक पातळीवर निवडणूकपूर्व संघटन मजबूत करण्याची ही बैठक यशस्वी ठरली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *