
बेळगाव : टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन निवड प्रक्रियेसाठी देशभरातून बेळगावात दाखल झालेल्या 600 पेक्षा अधिक तरुण उमेदवारांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमतर्फे पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
सीपीईड ग्राऊंड आणि शौर्य सर्कल परिसरात अनेक उमेदवार फुटपाथवर व मोकळ्या जागेत थांबून निवड प्रक्रियेसाठी तयारी करत असल्याचे टीमच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. उमेदवारांची जिद्द, त्यांची परिस्थिती आणि संघर्ष पाहून या मदत उपक्रमाची सांगोपांग अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमने दिली.
या सेवाभावी उपक्रमात संतोष दरेकर, डॉ. रोहित जोशी, जितेंद्र लोहार, दिनेश कोल्हापूर, प्रशांत बिर्जे आणि सुधाकर चाळके (निवृत्त उप. मेजर, भारतीय सेना) यांचे विशेष योगदान राहिले.
या मदतीबद्दल उमेदवार तसेच बेळगावकरांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे मनःपूर्वक आभार मानत त्यांना आशिर्वाद दिले. टीमने उद्याही सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta