Tuesday , March 3 2026
Breaking News

शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात दीपोत्सव!

Spread the love

 

पाच हजार पणत्यांनी उजळला मंदिर परिसर

बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचा सोहळा पार पडला. सुमारे पाच हजार पणत्या मंदिर परिसरात, आवारातील दगडी पायऱ्यांवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्याने आज (ता. १६) अख्खा परिसर प्रकाशाने उजळून निघाला.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. युवकांनी पणत्या मांडण्यापासून ते प्रकाश योजनेपर्यंत सर्व तयारीत सक्रीय सहभाग नोंदविला. मंदिरात ५ हजार दीप लावण्याचा संकल्प केला होता. तो दीपोत्सवाचा संकल्प पूर्ण झाला. या उत्सवासाठी शहरासह परगावाहून आलेल्या भक्तांची संख्या लक्षणीय होती. रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या महाआरतीने वातावरण अधिकच भक्तिमय झाले.

दीपोत्सवाच्या निमित्ताने परिसरात सुरक्षा, वाहतूक आणि स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक, विविध मंडळांचे प्रतिनिधी तसेच युवकांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली. रात्री उशिरापर्यंत मंदिराचा परिसर प्रकाशाने उजळलेला दिसत होता. मंदिर परिसरात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. शिवबसवनगरातील जोतिबा मंदिराचा दीपोत्सव हा गेल्या काही वर्षांत बेळगाव शहरातील आकर्षणाचा ठरलेला आहे.

मंदिरात आकर्षक रांगोळी

दरवर्षी बेळगावातून कोल्हापूरला सासनकाठी जाते. या देवदादा सासनकाठीचा इतिहास यावेळी रांगोळीतून मांडण्यात आला. मंदिरात तीन दिवस लावून ही रांगोळी रेखाटली आहे, अशी माहिती ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *