
बेळगाव : थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या कोळशाच्या शेकोटीमुळे तिघांचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील अमन नगर येथे घडली आहे. अमन नगर भागात एका खोलीत चार भावंडे वास्तव्यास होती. सध्या बेळगावात थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीमध्ये कोळशाची शेगडी पेटवण्यात आली होती. रात्री झोपताना खिडक्या दरवाजे बंद होते. कोळशामधून निघणाऱ्या कार्बन मोनाडाय ऑक्साईडमुळे झोपलेल्या अवस्थेत तीन भावंडांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बेळगाव येथील बीम्स इस्पितळात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व हा नेमका प्रकार कशामुळे झाला याबाबत तपास सुरू केला.
काल रात्री थंडीचा जोर वाढल्यामुळे रात्री उशिरा मृत भावंडांनी कोळशाची शेगडी पेटवली होती. रात्री उशिरा झोप लागल्यानंतर खोलीत मोठ्या प्रमाणात धूर साचला व ऑक्सिजनचा अभाव निर्माण झाला त्यामुळे खोलीत झोपलेल्या तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सदर घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून रेहान माटे (वय 22), सरफराज हरपनहळी (वय 23) आणि मोहिन नालबंद (वय 23) अशी मृतांची नावे असून शहानवाज हरपनहळी या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचसांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta