Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा खटल्यांची सुनावणी लांबणीवर

Spread the love

 

बेळगाव : काल दि. १८ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरील एकूण सहा खटल्यांची बेळगाव न्यायालयात सुनावणी होती. साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे सर्व खटले पुढे ढकलण्यात आले. सकाळपासूनच न्यायालयीन आवारात समिती कार्यकर्त्यांची वर्दळ पाहावयास मिळाली. खटल्यातील साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे सर्वच खटले तहकूब करून पुढील तारीख निश्चित करण्यात आली. 2021 च्या महामेळाव्याच्या खटल्यात दीपक दळवी व अन्य 29 कार्यकर्त्यांवर खटला दाखल करण्यात आला होता या खटल्यात काही कार्यकर्ते अनुपस्थितीत राहिल्यामुळे या खटल्याला पुढील तारीख देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चा दरम्यान शहाजीराजे भोसले व इतर कार्यकर्त्यांवर सीमा प्रश्नाचा उल्लेख असलेल्या टी-शर्टचा विक्रीचा आरोप करण्यात आला होता या खटल्यास साक्षीदार अनुपस्थित असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली तर 2016- 17 च्या महामेळाव्यात दीपक दळवी व मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्यात आला होता या खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दीपक दळवी यांचे विधान नोंदविण्यात आले. साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे या खटल्यात पुढील तारीख देण्यात आली तर कोरोना काळात मराठी कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रकरणी मध्यवर्ती पदाधिकारी व 31 कार्यकर्त्यांवर खटला दाखल करण्यात आला होता यासाठी देखील पुढील तारीख देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महादेव पाटील व सात कार्यकर्त्यांवर लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यास देखील पुढील तारीख देण्यात आली आहे. सर्व खटल्यांचे कामकाज ॲड. महेश बिबिर्जे, ॲड. मल्लेशी बोंद्रे, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. अश्वजीत चौधरी, ॲड. रिचमन रिची त्यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *