
बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात पुजारी श्री मारुती भट्ट यांनी पौरोहित्य केले.
यावेळी महिला मंडळाच्या महिलांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यानंतर सर्व महिलांनी दिवे लावून दिव्यांची सुंदर आरास केली होती. यानंतर विष्णू सहस्त्र नाम व श्री ललिता सहस्त्र नाम पठण करण्यात आले. त्यानंतर आरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. धनश्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा पार पडला.
यावेळी उपाध्यक्ष अश्विनी जांगळे, शोभा कंग्राळकर, सेक्रेटरी भारती किल्लेकर तसेच सदस्य सुमती कुदळे, पार्वती भातकांडे, सुमेधा जोशी, सुवर्णा शिंपी, हेमांगी ओवळकर, शीतल नेसरीकर, पद्मजा कामत, सुरेखा सावंत, सरिता कालकुंद्रीकर इत्यादी महिला मंडळाच्या तसेच इतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta