Wednesday , March 4 2026
Breaking News

राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 मध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचे नेत्रदीपक यश

Spread the love

 

बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगावच्या पॅरा अर्थात दिव्यांग जलतरणपटूंनी हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या 25 व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 या प्रतिष्ठेच्या जलतरण स्पर्धेवर वर्चस्व गाजवताना 37 सुवर्ण पदकांसह एकूण 59 पदके जिंकत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. तसेच कर्नाटक राज्याला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

गचीबोवली, हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात गेल्या 15 ते 18 नोव्हेंबर 2025 रोजी 25 व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 30 वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 450 हून अधिक अव्वल पॅरा जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जवळपास 21 होतकरू दिव्यांग जलतरणपटूंनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्विमर्स क्लब बेळगावच्या पथकाने जिंकलेली एकूण 59 पदके स्पर्धेवरील त्यांचे वर्चस्व अधोरेखित करत होती. या पदकांमध्ये 37 सुवर्ण पदके, 14 रौप्य पदके आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. बेळगावच्या जलतरणपटूंनी केवळ त्यांच्या वैयक्तिक कौशल्याचे प्रदर्शन केले नाही तर कर्नाटक राज्याला सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण अजिंक्यपदाची ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बेळगाव स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी मिळविलेले यश (अनुक्रमे नांव श्रेणी, सुवर्ण, रौप्य, कांस्य यानुसार) पुढील प्रमाणे आहे : 1) श्रीधर माळगी शारीरिकदृष्ट्या अपंग – 5-0-0, 2) स्वातीक पाटील शारीरिकदृष्ट्या अपंग – 5-0-0, 3) प्रज्वल हणमनट्टी दृष्टिहीन – 3-0-0, 4) सिमरन गौंडाळकर ठेंगू – 3-0-0, 5) सोनम मल्लू पाटील दृष्टिहीन 3-0-0, 6) साक्षी मल्लू पाटील दृष्टिहीन – 3-0-0, 7) पृथ्वी नरळेकर दृष्टिहीन – 3-0-0, 8) अनिकेत पिळणकर शारीरिकदृष्ट्या अपंग – 2-1-0, 9) साहिल जाधव शारीरिकदृष्ट्या अपंग – 2-0-1, 10) प्रज्वल नरळेकर 2-0-1, 10) प्रज्वल नरळेकर- 2-0-0, 11) शरण्या कुंबार बौद्धिकदृष्ट्या कमजोर – 2-0-0, 12) अमोल कांबळे शारीरिकदृष्ट्या अपंग – 1-1-1, 13) राघवेंद्र अणवेकर शारीरिकदृष्ट्या अपंग – 1-1-1, 14)अमोघ तंगडी दृष्टिहीन – 1-1-1, 15) आकाश हंजी दृष्टिहीन – 1-0-0, 16) बुशरा मुजावर बौद्धिकदृष्ट्या कमजोर – 0-3-0, 17) चिन्मय क्यमन्नावर दृष्टिहीन – 0-3-0, 18) सुमित मुतगेकर शारीरिकदृष्ट्या अपंग – 0-2-1, 19) रम्या लमाणी दृष्टिहीन – 0-2-0, 20) पार्थ दानोजी शारीरिकदृष्ट्या अपंग – 0-0-2, 21) सुकृथ यल्लाहट्टी दृष्टिहीन – 0-0-1.

उपरोक्त सर्व यशस्वी दिव्यांग जलतरणपटू केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव (ऑलिंपिक आकार) येथे पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना मुख्य प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्या नेतृत्वाखालील जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर व विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), राम मल्ल्या (सीएमडी, द अलाईड फाऊंडर्स प्रायव्हेट लिमिटेड), एसएलके ग्रुप बेंगलोर, डॉ. नितिन खोत, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आदीचे खूप सहकार्य व प्रोत्साहन मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *