
बेळगाव : बेळगावातील ऐतिहासिक आर.टी.ओ. क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकातील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात कार्तिक महिन्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावकरांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात गेल्या सुमारे १५० वर्षांपासून कार्तिकोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही हा कार्तिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदिराचे पुजारी श्रीधर अनगोळकर यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, “माझे कुटुंब गेली १५० वर्षे या मंदिराची सेवा करत आहे. दरवर्षी कार्तिकोत्सव होतो. आज दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे आणि सायंकाळी ‘लक्षदीपोत्सव’ सोहळा पार पडेल. दरवेळी सुमारे सात हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात,” असे त्यांनी सांगितले. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta