
विद्यार्थ्यांसाठी नवे तांत्रिक पाऊल
येळ्ळूर : आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून जय भारत फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी येळ्ळूर येथील शाळेला तब्बल 10 संगणकांची देणगी प्रदान करण्यात आली. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमात येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री. सतिश बाळकृष्ण पाटील तसेच महेश मल्लाप्पा चौगुले, आनंदवाडी शहापूर यांनी विशेष प्रयत्न करून ही देणगी शाळेपर्यंत पोहोचवली. आधुनिक शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढविण्यासाठी त्यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या कार्यक्रमाला ज्योतिबा उडकेकर (एसडीएमसी उपाध्यक्ष) हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी जयभारत फाउंडेशनचे बसवणगौडा पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे 2004-05 सालचे 7 वीचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेला एक आठवण म्हणून ड्रॉ कपाटाची भेट दिली. माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही भेट शिक्षक- विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते आणि शाळेशी असलेली भावनिक बांधिलकी अधिक दृढ करते.
यावेळी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी सर, सर्व शिक्षकवृंद एसडीएमसी सदस्य तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेला मिळालेल्या या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल, संगणक शिक्षणाची गुणवत्ता वाढेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. या उपक्रमासाठी जय भारत फाउंडेशन, श्री. सतिश पाटील यांचे विशेष कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta