
बेळगाव : देसूर गावातील रस्ते निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी देसूर गावाच्या विकासासाठी तसेच ग्रामस्थांच्या सोईसाठी उपयुक्त ठरणार आहे. गावकऱ्यांच्या विनंतीवरून तसेच देसूर काँग्रेस कमिटीच्या विनंतीवरून ग्रामीण आमदार तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीचा उपयोग खालील रस्त्यांसाठी होणार आहे
१) लक्ष्मी नगर देसूर शशिकांत कुंडेकर यांच्या घरापासून ते बसवराज कुंभार यांच्या घरापर्यंत.
२) माऊली नगर पहिला क्रॉस वासुदेव पाटील यांच्या घरापासून ते अशोक पोटे यांच्या घरापर्यंत.
३) माऊली नगर तिसरा क्रॉस संजय मनोहर कुंडेकर यांच्या घरापासून ते प्रसाद मोहन गुरव यांच्या घरापर्यंत.
४) माऊली नगर चौथा क्रॉस कृष्णा लोहार यांच्या घरापासून ते सोयल मुल्ला यांच्या घरापर्यंत.
५) माऊली नगर पाचवा क्रॉस सुनील गुरव यांच्या घरापासून ते किसन गुरव सर यांच्या घरापर्यंत.
६) शिवाजी नगर देसूर राजू जळगेकर यांच्या घरापासून ते संतोष टोपकर यांच्या घरापर्यंत.
७) श्री. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते श्री. ब्रह्मलिंग मंदिर.
Belgaum Varta Belgaum Varta