Sunday , December 7 2025
Breaking News

संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा- वार्षिक क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा येथे शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय गोवकर जी, मुख्य अतिथी श्री. पंकज सुरेश रायमाने जी, विशेष अतिथी श्री. अशोक बंडोपंत शिंत्रे जी, अन्य अतिथी श्री. भालचंद्र गाडगीळ जी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. देवीप्रसाद कुलकर्णी जी, मुख्याध्यापिका सौ. आरती पाटील आणि शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, स्वागत नृत्य, ध्वजवंदन आणि आकर्षक मार्च-पास्टने झाली. सरस्वती पूजन हे उपस्थित पाहुणे, मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्यांच्या हस्ते संपन्न झाले.

शाळेची प्रमुख विद्यार्थीनी म्हणून कु. सेजल डोंबळे हिने शपथ घेतली. त्यानंतर एकलव्य, अर्जुन, द्रोणाचार्य आणि बलराम या चार गणांचे संघप्रमुखांनी मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यानंतर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून आकर्षक ड्रिल व्यायाम सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून आपली कला आणि खेळाविषयीची आवड प्रभावीरीत्या प्रदर्शित केली.

उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उत्साहाने खेळांमध्ये सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिले तसेच “क्रीडा ही शारीरिक, मानसिक आणि चारित्र्य विकासाची गुरुकिल्ली आहे” असा प्रेरणादायी संदेश दिला.

शाळेच्या मैदानावर धावणे, रिले रेस, लाँग जंप, लेमन-स्पून, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, थ्रोबॉल, फुटबॉल आदी विविध खेळांच्या रोमांचक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या स्पर्धांच्या यशात शाळेच्या कार्य समन्वयक (कोऑर्डीनेटर) सौ. आशा भुजबळ, शारिरीक शिक्षिका सौ. श्वेता पाटील, तसेच शिक्षक श्री. श्रीकांत कांबळे आणि श्री. सूरज सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

उर्वरित खेळ २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषेतील स्वागत फलक कन्नड संघटनांकडून टार्गेट!

Spread the love  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या स्वागताकरिता भाजपाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *