
बेळगाव : एम. व्ही. हेरवाडकर स्कुलच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मिनी ऑलम्पिक इत्यादी, विजयी विद्यार्थ्यांची रॅली टिळकवाडी विभागामध्ये काढण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कुमारी कल्याणी आंबोळकर (कुस्ती), कुमारी तन्वी कारेकर (स्वीमींग), कुमारी राशी महेश हळभावी (शुटींग), कुमार गीतेश सागेकर बुद्धीबळ (चेस) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री. दिलीप चिटणीस सर, डॉ. अजित कुलकर्णी, श्री. राजेश शिवलकर सर, श्री. ज्ञानेश कलघटगी सर, श्री. एस वाय प्रभू सर, सौ. अलका कुलकर्णी मॅडम, सौ. हेमांगी प्रभू मॅडम, सौ. गायत्री गावडे मॅडम, श्री. पंकज शिवलकर सर. श्री. प्रवीण पुजार सर, सौ. यशश्री देशपांडे मॅडम, प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम तसेच टिळकवाडी पोलीस स्टेशन बेळगाव विभागाचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
सकाळी ठीक 9.30 वाजता सुरवात करण्यात आले. या रॅलीला प्रमुख पाहुणे माननीय श्री. दिलीप चिटणीस सर यांच्याहस्ते सुरवात करण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थित होते. या रॅलीमध्ये स्कुलचे राज्य व राष्ट्रीय स्तराच्या क्रिडा विभागामध्ये, मिनी ऑलम्पिक, तसेच फादर एडी चषक फुटबॉल, युनायटेड गोवन्स चषक, दासाप्पा शानभाग चषक क्रिकेट, हनुमान चषक, हॉकी चषक, बॅडमिंटन, रनिंग, शुटींग, ड्राईंग, व इतर वेगवेगळ्या विभागामधे विजयी झालेले सर्व विद्यार्थी तसेच एन.सी.सी., बॅन्ड पथक, इत्यादी सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
ही रॅली हेरवाडकर स्कुल पासुन सुरुवात करण्यात आले. ही रॅली खानापुर रोड, टिळकवाडी मेन रोड, आर पी डी. कॉलेज कॉर्नर रोड, गोवावेस सर्कल, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, सोमवार पेठ रोड, जी जी चिटणीस स्कुल रोड, व एम व्ही हेरवाडकर इंग्लीश मिडीयम स्कुल टिळकवाडी बेळगाव इत्यादी विभागामध्ये काढण्यात आली.
या रॅलीचे नियोजन एम व्ही हेरवाडकर हायस्कुल सर्व शिक्षक, विद्यार्थी, तसेच बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे मॅनेंजमेंन्ट मेंबर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta