
बेळगाव : वडगाव येथे मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने 16 नोव्हेंबर 2025 रोजी संघटनेचा 94 वा वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला हो.ता मराठा समाज सेवा मंडळ संचालित वधु वर पालक मेळावा कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गोविंद पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हवाई दलाचे निवृत्त अधिकारी श्री. सुरेश बाळन्नावर व सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक अर्जुन चौगुले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन संस्थेच्या संचालक व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी समाज प्रबोधनपर भाषण करत स्वानुभव कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त प्राचार्य एस. ए. पाटील यांनी केले तर कार्यालयीन कामकाजाची माहिती श्री. रवळनाथ पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एच. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला निंगोजी पाटील यांच्यासह वधू- वर पालक, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta