Wednesday , March 4 2026
Breaking News

हलगा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 जणांना अटक

Spread the love

 

बेळगाव : हलगा येथे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यावर धाड टाकून बागेवाडी पोलिसांनी अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या पाच तरुणांना अटक करून त्यांच्या जवळील पाच हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. विजयनगर हालगा येथील तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगारी अड्डा सुरू होता. बागेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रणय अनंत गोरल (वय 22, राहणार भारत गल्ली खानापूर बेळगाव), सचिन सदानंद अनगोळकर (वय 45 वडगाव बेळगाव), किशोर तानाजी सुतार (वय 47, येळ्ळूर रोड वडगाव), विश्वनाथ रवी गोटडकी (वय 29, राहणार भांदुर गल्ली बेळगाव), प्रथमेश गजानन यादव (वय 25, राहणार मिरापूर गल्ली शहापूर) अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेले सर्व जण काल शुक्रवारी हलगा येथील विजयनगर तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत होते. अंदरबाहर जुगार खेळत असताना बागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार व त्यांच्या पथकाने धाड टाकून आरोपींना रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह अटक केले आहे. याप्रकरणी बागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *