Tuesday , June 25 2024
Breaking News

फिटनेस फंडा जोपासणारी बेळगावची क्रिकेट वेडी तरूणाई

Spread the love

बेळगाव (एस. के. पाटील) : अलिकडे वाढत चाललेली व्यस्थता, धाकाधकीचे जीवन त्यातच कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आजवर जगण्याला नवा आयाम देणारी पिढी या सगळ्या दैनंदिन दिनचर्यातून उसंत काढून बेळगावची क्रिकेट वेडी तरुणाई आपला फिटनेस फंंडा जोपासत आहे.
खरतरं एखाद्या खेळाचं वेडं हे माणसाला सर्वोत्तोपरी सुख देत असते. कारण अलिकडे मानव वर्गासाठी अनेक प्रश्न एकदम जिकिरीचे झाल्याचे निदर्शनास येत आहे, त्याचेचं एक प्रत्ययदायी कारण म्हणजे नुकताच प्रत्येकाच्या मनात भिती पेरून गेलेली महामारी होय.
अशाकाळात धोबीघाट प्रिमियम लीग बेळगाव मार्फत आपल्या कामाच्या व्यस्थतेतून वेळ काढत बेळगावची तरूणाई स्वत:च्या आरोग्य विषयक जडणघडणीसाठी झटत आहे.
इतकेच नाही तर मैदानावर आलेल्या प्रत्येकाला खेळ आणि खेळाचे महत्व समजुन सांगत आरोग्य आणि मानसिक मनोधैर्य उत्तम राखण्याचा सल्ला देत आहे. धोबीघाट प्रिमियम लीग बेळगाव मार्फत दर सोमवारी होणार्‍या क्रिकेट स्पर्धेत अनुक्रमे,
1. धोबीघाट इंडियन्स – संघ मालक अनंत पाटील
2. चेन्नई एक्सप्रेस – संघ मालक अबिद बस्ती
3. पावनखिंड – संघ मालक सुधीर
4. मराठा वॉरियर्स – संघ मालक संजय माने
या संघानी सहभाग घेतला आहे.
आजच्या झालेल्या सामन्यात धोबीघाट इंडियन्स आणि मराठा वॉरियर्स या दोन्हीही संघानी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले असून आज झालेल्या सामन्यात राकेश पाटील, अमित पावसे, महेश हुलजी, दिपक कवाळे, संजय माने व मनोज सुतार या युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच प्रदर्शन केले. आज दिवसभरात झालेले सामने प्रत्येक संघाच्या कामगिरीची चमक दाखवणारे असले तरीही आज धोबीघाट मैदानावर खेळणारे बरेचसे खेळाडू कामाच्या व्यापातून वेळ काढून विरंगुळा जोपासत धावसंख्येचा आलेख उंचावू पाहत होते.
तसेच पुढील सोमवारी होणार्‍या सेमीफायनल व फायनल स्पर्धेसाठी निरोगी जगणार्‍या सर्वांना धोबीघाट प्रिमियम लीगने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजपा उत्तर विभागाच्यावतीने लसीकरण मोहिम

Spread the love  बेळगाव : भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *