Monday , September 21 2026
Breaking News

देवराईतील मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांना लाभ

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) येथील इरफान तालिकोटी हाऊस येथे सोमवारी दि. 29 रोजी गोधोळी विभाग माजी तालुका पंचायत सदस्य व युवा काँग्रेस अध्यक्ष इम्रान तालिकोटी व काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी होते. तर कार्यक्रमाला एम.के. हुबळी साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, हलशी आरोग्य केंद्राचे डॉ. जोतीष गोपीनाथ, डॉ. रवीराज पै, डॉ. शालीनी बेकन्नावर आदींनी या शिबीरात डोळे तपासणी व मोफत चष्मा वितरण, सांधे दुखी तपासणी, मधुमेह तपासणी, टीबी रोगीची तपासणी केली. तसेच डोळ्यांचे ऑपरेशन, मोती बिंदू ऑपरेशन करण्याविषयी मार्गदर्शन करून संबंधितांची यादी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्याचे आश्वासन काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांनी दिले. तसेच प्रत्येक वर्षी आरोग्य तपासणी शिबीर ठेवणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिबीराला गर्लगुजी पीकेपीएस सोसायटीच्या संचालक राजू सिध्दाणी, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, महमदशरीफ मुजावर, लक्ष्मण चौरी, मारूती ईश्राणी, विष्णू आपटेकर, महमदशरीफ इनामदार, चंद्रकांत कदम, तुकाराम पठाण, मुरलीधर पाटील, पुंडलिक पाटील, आप्पाजी पाटील, कल्लापा पाटील, नारायण गावडा, कृष्णा जी वीर, बाळाराम कामते, तसेच देवराई, घोटगाळी, कुंभार्डा, मुंडवाड, शिवठाण, गोदगेरी, हलगा, चिंचेवाडी, सुळेगाळी, जांबेगाळी आदी गावचे नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *