
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू सी एम त्यागराज यांनी ही माहिती आज सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
उद्या मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीदान समारंभ राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते शिवाजीराव कागणीकर यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
कट्टनभावी, निंगेनहट्टी, गुरामहट्टी, कडोली आदी ग्रामीण भागात दोन लाख झाडांची लागवड, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, तलाव, विहिरी व बंधाऱ्याची निर्मिती करून जमीन ओलिताखाली आणणे, मनुष्यासह पशुपक्षांनाही सुखावणारे, नरेगा या योजनेमधून सर्वांना काम मिळवुन दिलेलं आहे.
यासोबतच निरक्षरासाठी प्रौढ शिक्षण तसेच अरण्य भागात मुलामुलींसाठी शिक्षण सुरू करणारे डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या आदर्श आणि प्रेरणादायी कार्याचा राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने सन्मान होणार आहे
Belgaum Varta Belgaum Varta