
बेळगाव : सह्याद्री नगर येथील घरातील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडील 3.78 लाखांच्या किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्याची कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली आहे.
गविसिदप्पा मंजुनाथ हलसुर (वय 72 वर्षे) सध्या राहणार रा. रघुनाथ पेठ, ता. अनगोळ, मूळचे टिस्क उसगाव, ता. पोंडा, मडगाव, गोवा राज्य असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी सह्याद्री नगर, बेळगाव येथील लीना पठाण यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणी गु. नं. 149/2025, कलम 331(3), 305(1) भारतीय न्याय संहिता–2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीआय यू. एस. अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सखोल तपास करत दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एपीएमसी पोलिस ठाण्याच्या पथकाने घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून चोरीस गेलेले 33.130 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 3,78,110/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta