Wednesday , March 4 2026
Breaking News

रयत गल्लीत पुन्हा एक म्हैस अचानक दगावली

Spread the love

 

बेळगाव : रयत गल्लीतील युवा शेतकरी प्रदिप आनंदा बिर्जे यांची दुसऱ्या वेताची अलिकडेच विलेली म्हैस अचानक दगावल्याने सुमारे 80,000 रुपयाचे नुकसान झाले. सकाळी दुध काढून झाल्यावर पाणी, चारा घातले. परत दुपारीही गवत घातल्यावर खात असलेली म्हैस संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान अचानक खाली कोसळली आणि गोठ्यातच दगावल्याने सदर कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावरं पाळतो पण अचानक अशी दुखःद घटना घडल्यास मोठी हानी होते. मागच्याच एक नोव्हेंबर रोजी भारत नगर येथे याच गल्लीतील सुमारे अडिच लाखाची पंढरपूरी जातीची म्हैस रस्त्याच्या बाजूला लावलेले शोभेच्या विद्यूत खांबातून खाली बाहेर आलेल्या विद्युत तारेचा स्पर्श लागून जागेवरच दगावल्याचे मोठे नुकसान झाले. परत आज आणखी एक किमती म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. सरकारने अशी जनावर दगावल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन तारल्यास दिलासा दिल्यासारख होईल अशी समस्त शेतकरी बंधूतर्फे अपेक्षा.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *