
बेळगाव : प्रवाशांशी सरकारी बसचालकाचा वाद झाल्यानंतर चालकाने भर महामार्गावर बस थांबवून प्रवाशांशी पुन्हा वाद घालून खोळंबा केल्याची घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोंडुसकोप्पजवळ घडली.
कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसचालकाने प्रवाशांशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर बेळगाव तालुक्यातील कोंडुसकोप्पजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस अडवून ठेवल्याची घटना घडली. ही बस बेळगावहून हुबळीला जात होती. त्यावेळी प्रवाशांसोबत चालकाचा काही कारणावरून वाद झाला. पाहता-पाहता हा वाद विकोपाला पोहोचला आणि चालकाने भर महामार्गावरच बस थांबवून प्रवाशांचा खोळंबा केला. भर रस्त्यातच बस थांबवल्याने पाठीमागून वाहनांची रांग लागली आणि ट्रॅफिक जॅम झाला. त्यामुळे अन्य वाहनचालकांना, प्रवाशांनाही मनस्ताप सोसावा लागला.
Belgaum Varta Belgaum Varta