Thursday , June 20 2024
Breaking News

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राज्य रयत संघटनेशी चर्चा

Spread the love

e

शेतकर्‍यांच्या प्रश्नी सभागृहात आवाज उठविण्याची ग्वाही
निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दलाचे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज बेंगळुरू येथे राज्य रयत संघटनेशी चर्चा करून शेतकर्‍यांना राज्यात प्रश्नांबाबत चर्चा केली. याप्रसंगी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. भेडसाविणार्‍या यावेळी कुमारस्वामी यांनी राज्यातील रयतांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. आपल्या कारकिर्दीत शेतकर्‍यांसाठी विविध हितकारी योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा लाभ शेतकर्‍यांना झाला आहे. सध्या राज्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासंदर्भात रयत संघटनेने निपक्ष राहून शेतकर्‍यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असून संघटनेने दिलेल्या सूचनांसंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवून शेतकर्‍यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागाव्यात याकरीता प्रयत्न करणार आहोत. संघटनेने कार्य जोमाने सुरू ठेवावे असे सांगितले.
यावेळी त्यांनी चिकोडी जिल्ह्यात संघटनेच्या सुरु असणार्‍या चळवळीबद्दल संघटनेचे अभिनंदन केले. राजू पोवार हे मोठ्या धैर्याने शेतकर्‍यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कामकरीत आहेत. त्यांना आपले सर्वतोपरी सहकार्य राहणार असून त्यांनी सर्व शक्तिने आपले काम करावे. आपण त्यांच्या पाठिशी ठामपणे राहू अशी ग्वाही दिली. यावेळी राजू पोवार यांनी निपाणी तालुक्यात शेतकर्‍यांना मोठ्या समस्या भेडसावित आहेत. तहसिल कार्यालयाकडून अद्यापही महापूर, अतिवृष्टी काळात नुकसान झालेल्या घरांची नुकसानभरपाई दिलेली नाही. शेतकर्‍यांना लहान-मोठ्या कारणावरून वेठीस धरण्यात येत असल्याने पीकेपीएस शेतकर्‍यांना माध्यमातून मदत केली जात नाही. विजेच्या बीलांकरीताही समस्या निर्माण करण्यात येत आहे. मात्र आपला त्याविरोधात लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तीन तास सुमारे चाललेल्या या चर्चेत राज्यातील संघटना पदाधिकार्‍यांनी सहभाग घेवून आपल्या समस्या कुमारस्वामी यांच्यासमोर मांडल्या याप्रसंगी राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चन्नाप्पा पुजारी, यल्लाप्पा रामदूर्वी, रवि सिध्दण्णावर, राज्य कार्यदर्शी सिध्दविरप्पा हादिकर, वासू पंड्रोळी, मंत्री सुभाष आयकूर, मल्लिकार्जुन यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकार्‍यांची हजेरी होती.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला इंधन दरवाढीचा बचाव

Spread the love  विकास कामासाठी वापराची ग्वाही बंगळूर : लोकसभा निवडणुकीत हमी योजनांचा काँग्रेसला फारसा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *