Sunday , September 20 2026
Breaking News

लोकांना कायद्याची माहिती असायला हवी : न्यायाधीश बी. एस. पोळ

Spread the love

 

 

 

 

 

 

 

संकेश्वर (प्रतिनिधी) : लोकांना कायद्याची माहिती असायला हवी असल्याचे संकेश्वर सिव्हिल न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. पोळ यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री साईभवन येथे आयोजित कायदा माहिती आणि मदत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका कायदा सेवा समिती आणि ओंम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. न्यायाधीश पोळ पुढे म्हणाले, लोकांनी कायद्याचा सन्मान करायला हवे असेल तर त्यांना सामान्य कायद्याची माहिती असायला हवी आहे. कायद्या सर्वांना समान लागू असतो. पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते. नागरिकांनी कायद्याचे पालन करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक भाषण मुख्याध्यापक पी.डी. पाटील यांनी केले. प्रारंभी श्रीमती लिना कोळी यांनी प्रार्थना गीत सादर केले. यावेळी बोलताना ॲड.पी. एस. नेसरी म्हणाले, वाहतुकीचे नियम पालन केल्यास अपघात टाळणे शक्य आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालविल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. दुचाकी असो तीनचाकी चारचाकी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळा असे त्यांनी सांगितले.

यावेळी संकेश्वर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. एस. चौगला, ॲड. कनका मिर्जी, ॲड. सी.एस. सनदी, आणप्पा डोनवाडे, रामण्णा मुरचिट्टी, अच्युत पेंडसे, अनिता नागराळे, रंजना मगदूम, अश्विनी चिनमुरी, सुनिता सनदी, लिना कोळी योग साधक उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. मगदूम यांनी केले. आभार शिक्षक एस.आर चिनमुरी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *