

बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. महाजन अहवालच अंतिम असल्याची गरळ खासदार जगदीश शेट्टर यांनी ओकली असून या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, बेळगावचे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. विभाजन झाल्याने विकास कामांना गती मिळेल. सीमाप्रश्नी विचारले असता म्हणाले, सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. महाजन अहवाल अंतिम असल्याचे सांगितले.
शेट्टर यांच्या व्यक्तव्याचा महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच प्रश्न संपला असेल, तर कर्नाटक सरकारकडून काही दिवसांपूर्वी सीमासमन्वयक मंत्र्यांची का नेमणूक करण्यात आली? तसेच निकाल महाराष्ट्राच्या बाजूने लागू नये, यासाठी का प्रयत्न केले जात आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta