
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटकाच्या मान्यतेने विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजक सप्तशक्ती संगम भगवदगीता कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आज मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत, सौ. तृप्ती हिरेमठ, गौरी गजबरे, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका व विद्याभारती कर्नाटक प्रांत कार्यवाहीका सौ. सुजाता दप्तरदार व सहमुख्याध्यापिका सौ. ऋतुजा जाधव व्यासपीठावर होत्या.

डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी “आरोग्य समाजातील स्त्रीची भूमिका आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन” या विषयावर मार्गदर्शन केले तर सौ. तृप्ती हिरेमठ या म्हणाले की, जिजाऊंच्या संस्काराने शिवरायांमध्ये निर्माण झालेली धैर्य दृढता सत्यनिष्ठा यांची शिकवण प्रत्येक आईने आपल्या मुलांमध्ये रुजवावी. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सप्तशक्तीचे अनावरण पर्यावरणाचे महत्त्व सत्यदेवीतील तत्त्वज्ञान आणि मानवी जीवनातील निसर्ग संरक्षणाचे स्थान याचे सौ. तृप्ती यांनी अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले. “हिरवेच श्वास- श्वासच हिरवा” हा संदेश मुलांमध्ये सप्तशक्ती विकसित करण्याच्या संदर्भात त्यांनी दिला. तर सौ. गौरी गजबरे यांनी कुटुंब प्रबोधन प्रणाली, स्त्रीचे मार्गदर्शन, व संस्कारयुक्त समाज निर्मिती यावर हृदयस्पर्शी भाष्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तीलोत्तमा गुमास्ते यांनी केले तर उपस्थित यांचा स्वागत व परिचय सौ. अमृता पिटकेर यांनी करून दिला संकल्प वंदने नंतर साधक म्हणून वीणा जिगजीनी आणि राधा गुणगा यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांचा परिचय सौ. वीणा जोशी यांनी केला. सौ. पद्मिनी कुलकर्णी यांनी मनोहर गीत सादर केले.
या कार्यक्रमात महिला शक्ती सप्तशक्तीचे तात्विक महत्व आधुनिक समाजातील त्यांची प्रासंगिकता यावर विचार मंथन झाले तसेच देवीच्या शक्ती तत्त्वाचे प्रतिनिधित्व करणारा अत्यंत सुंदर छद्मवेशात शक्ती तत्त्वाचे आकर्षण दर्शन घडले. प्रमुख वक्त्यांच्या संस्कार प्रधान प्रेरणादायी आणि जीवन उपयोगी विचारांनी प्रेमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी भूषविले. यावेळी विद्याभारती कर्नाटकच्या प्रांत कार्यवाहीका तसेच संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता दप्तरदार, प्रांत पदाधिकारी श्री. रामकृष्णजी, उपाध्यक्ष श्री. माधव पुणेकर, श्री. किशोर काकडे, संत मीरा शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, आरोग्य भारती कार्यकर्ते, संस्कार वर्ग प्रतिनिधी व शाळेचे सर्व शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप शांतिमंत्राने झाला.
Belgaum Varta Belgaum Varta