

बेळगाव ‘ शहरातील मां दुर्गा फाऊंडेशनतर्फे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप नगरसेविका व महिला कार्यकर्त्यांचा सत्कार केला गेला.
इनसोम्नीया येथे आयोजित सदर जागतिक महिला दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री पदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला वनाधिकारी सौ. सुनीता निंबरगी उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमात भाजप महिला विभागाच्या राज्य सचिव उज्वला बडवानाचे, महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णा पाटील, नगरसेविका मीना बसापुर, सविता कांबळे, रूपा चिक्कलदिनी, रेखा हुगार, बालभवनच्या सदस्य लीना टोपण्णावर, प्रियांका आजरेकर आणि सविता करडी यांना महिला दिनानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रियांका कलघटकर, शिल्पा केंकरे, प्राधान्या शिंदे, सविता गुड्डाकाई, ज्योती शेट्टी आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta