Wednesday , March 4 2026
Breaking News

अग्निवीर अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसकडून सन्मान!

Spread the love

 

देसूर : भारतीय सैन्य दलात (Agniveer Technical) पदावर निवड झालेल्या देसूर येथील सुपुत्र अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचे व्रत घेतलेल्या अनिरुद्ध यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्याद्वारे करण्यात आला.

यावेळी बोलताना उचगाव ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील म्हणाले, “देसूरसारख्या ग्रामीण भागातील युवकाने आपल्या कर्तृत्वाने भारतीय सैन्य दलात स्थान मिळवणे, ही देसूर गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. अनिरुद्ध हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो.”

युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि उपस्थित ग्रामस्थांनी अनिरुद्ध पाटील यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *