Tuesday , March 3 2026
Breaking News

कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणार; शहर समितीच्या बैठकीत निर्धार!

Spread the love

बेळगाव : बेळगाववर आपला अधिकार सांगण्यासाठी कर्नाटक सरकार 2006 पासून बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन बेळगाव घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते परंतु परिणामांची तमा न बाळगता यंदाचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्णय शहर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी 30 नोव्हेंबर रोजी रामलिंग खिंड गल्ली येथील रंगूबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर हे होते. बैठकीच्या सुरुवातीला सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांच्यासह ज्ञात अज्ञात दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक रणजीत चव्हाण पाटील यांनी केले. यावेळी महामेळाव्याची दिशा ठरविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

कन्नड साहित्यिक व खासदारांच्या वक्तव्यांचा निषेध

बैठकीदरम्यान, बेळगाव सीमा प्रश्न ‘संपला’ असा नेहमी दावा करणारे खासदार जगदीश शेट्टर यांच्या वक्तव्याचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे होते असा दावा करणाऱ्या कन्नड साहित्यिकाच्या वक्तव्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला.

बैठकीदरम्यान प्रकाश मरगाळे, रणजित हावळाणाचे, सागर पाटील, रणजित चव्हाण पाटील, रमेश पावले, अभिजित मजुकर, श्रीकांत कदम, प्रकाश नेसरीकर आदींनी विचार मांडले.

यावेळी शिवराज पाटील, बाबू कोले, विनोद आंबेवाडीकर, अंकुश केसरकर, श्रीधर खन्नूकर, उमेश पाटील, देसाई सर, सूरज कुडूचकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *