
बेळगाव : शहापूर पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर धाड टाकून दोघा जणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्याकडील रोख 2,150 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केल्याची घटना काल शनिवारी घडली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अश्पाक दादाहीर सनदी (वय 39, रा तंबीट गल्ली, होसुर बसवान गल्ली शहापूर बेळगाव) आणि प्रज्वल उर्फ ज्योतिबा शंकर कितवाडकर (वय 28, रा. महाद्वार रोड संभाजी गल्ली बेळगाव) अशी आहेत.
हे दोघेजण जुन्या पी. बी. रोडवरील पॅटसन शोरूम शेजारी सार्वजनिक ठिकाणी मटका जुगाराचे आकडे घेत होते. याबाबतची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून अश्पाक व प्रज्वल यांना रंगेहात पकडून अटक केली. तसेच त्यांच्या जवळील रोख 2,150 रुपये आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta