Tuesday , March 3 2026
Breaking News

देसुरच्या प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन उत्साहात

Spread the love


बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देसुर गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला.
सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप एसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वी सिंग, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे संचालक जस्विर सिंग उपस्थित होते. प्रारंभी मंदिर कमिटीच्यावतीने पाहुण्यांचा शाल व श्रीफळ तसेच हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे पृथ्वी सिंग, रमेश गोरल आणि जस्विर सिंग यांच्या हस्ते मंदिरचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
मंदिराच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करून महाप्रसादाला चालना देण्यात आली. याप्रसंगी चेतन पाटील, रमेश पाटील, बापू, संकेत पाटील, यल्लाप्पा सावंत, विनोद पाटील, रणजित पोटे आदींसह इतर श्रीराम भक्त व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *