
बेळगाव : जयभारत क्लासिक -2025 ही बेळगांव जिल्हा ग्रामीण मर्यादित व महाविद्यालयीन टॉप -10 व दिव्यांगासाठी शरिर सौष्ठव स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालयमध्ये संपन्न झाली. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर हितेंद्र मराठे, कर्नल अर्पित थापा, दयानंद कदम, बसंनगौडा पाटील, प्रेमनाथ नाईक, किशोर गवस, रणजित किल्लेकर, गिरीश बरबर इतर मान्यवर होते,
या स्पर्धेमध्ये ग्रामीणचे 70 व महाविद्यालयीनचे 35 व दिव्यांगचे 3 स्पर्धक असे एकूण 108 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत मध्ये खानापूर तालुक्याचा “नागेश चोरलेकर” हा जयभारत क्लासिक 2025 चा मानकरी ठरला व खानापूरचा सिद्धार्थ गावडे हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला, तसेच कॉलेज टॉप 10 ह्या स्पर्धेमध्ये ओमकार किशोर गवस (गोमटेश कॉलेज) चा विद्यार्थी मानकरी ठरला. ओम विजय पाटील हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला, तसेच दिव्यांगामध्ये मारी अवरागोळ (गोकाक) चा मानकरी ठरला. ह्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून राजेश लोहार, रणजित किल्लेकर, अनिल अंबरोळे, नागेंद्र मडीवाळ, विजय चौगुले, भारत बाळेकुंद्री, बाबू पावशे, सुनील बोकडे, श्रीधर बारटक्के, संतोष सुतार, नारायण चौगुले यांनी काम पाहिले व स्टेज मार्शल म्हणून दीपक कित्तुरकर, राजेश पाटील, सोमनाथ हलगेकर यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta