
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे आयोजित हिवाळी अधिवेशना वेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेनाडी येथील बसवेश्वर कन्नड शाळेमध्ये ग्रामस्थ व रयत संघटनेच्या शाखेतर्फे बैठक घेण्यात आले. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
राजू पोवार यांनी, अतिवृष्टी महापूर काळातील पीक नुकसानीची भरपाई मिळावी. शेती पाणी पुरवठ्यासाठी निरंतर वीज पुरवठा करण्यात यावा. सोयाबीनसह इतर पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. यासह विविध मागण्यांसाठी विधानसभेत समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. ऊसाला योग्य दर मिळवून दिल्याबद्दल राजू पोवार यांचा संघटनेच्या बेनाडी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. बैठकीस अशोक क्षीरसागर, शिवानंद चौगुले, ॲड. शिवकुमार चौगुले, कलगोंडा कोटगे, सिद्धू मिरजे, आनंद गायकवाड, सागर पाटील, नामदेव नाईक, भरत मंगावते, सुरेश चंदुरे, सचिन कोटगे, विठ्ठल गुरव, आप्पासाहेब मिरजे, महेश जनवाडे, प्रकाश नुले, राकेश स्वामी, महेश बन्ने, संतोष मंगावते, संदीप देसाई, शेखर क्षीरसागर, सचिन क्षीरसागर यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta