Wednesday , March 4 2026
Breaking News

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. पीठ गिरणीवर जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढत उसाच्या शेतात नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती उशिरा उघडकीस आली आहे.

मुरगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन पुरुषांनी अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. सदर घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली होती परंतु आरोपी मनीकांत दिनीमनी आणि इराण संकमणावर या दोघांनी हे कृत्य केले असून पीडित मुलीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास टाळाटाळ केली. परंतु काल पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असता आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सापळा रचून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *