
बेळगाव : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४८४ अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ प्रमुख पाहुणे मेजर जनरल हरी भास्करन पिल्लाई यांच्या उपस्थितीत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला. राष्ट्रीय ध्वज आणि रेजिमेंटल ध्वज यांच्या साक्षीने अग्निवीर जवानांनी देशसेवेची शपथ घेतली.

अग्निवीर जवानांनी एकतीस आठवड्याचे खडतर प्रशिक्षण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे घेतले आहे. यावेळी अग्निवीर जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. संचालनाचे नेतृत्व पवन यल्लाकुरी यांनी केले. प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामागिरी बजावलेल्या अग्निवीर सैनिकांना मेजर जनरल हरी भास्करन पिल्लाई यांनी मेडल प्रदान केले. युद्ध स्मारकाला अभिवादन करून दीक्षांत समारंभाची सांगता झाली. दीक्षांत समारंभाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, अधिकारी, अग्निवीर जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta