Tuesday , March 3 2026
Breaking News

ग्रामीण आणि माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन मटका बुकींना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण आणि माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत मटका जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन मटका बुकींना अटक करून त्यांच्याकडील ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या व रोख रक्कम जप्त केली. अटक केलेल्या आरोपींची नावे श्याम भगवानदास गुलबानी (राहणार सिंधी कॉलनी हिंडलगा) तर सुनील देवाप्पा कांगली (आंबेडकर नगर, सदाशिव नगर बेळगाव). श्याम गुलबानी हा बॉक्साइड रोडवरील कच्च्या रस्त्याच्या शेजारी कल्याणी ओसी मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक लक्ष्मण जोडट्टी यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाड टाकून शाम गुलबानी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मटक्याचा चिठ्ठ्या आणि 1760 रुपये जप्त केले तर दुसरा आरोपी सुनील याला कणबर्गी तलावाशेजारील सार्वजनिक ठिकाणी मटक्याचा अड्डा चालवत होता. याची माहिती माळमारुती पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी धाड टाकून आरोपी सुनील याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळील ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या आणि 5570 रुपये रोख रक्कम जप्त केली असून याप्रकरणी ग्रामीण आणि माळमारुती पोलीस स्थानकांमध्ये वेगवेगळे गुन्हे नोंद झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *