Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये “अवयवदान” विषयावर सेमिनारचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आज शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी “अवयवदान” या महत्त्वपूर्ण विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी व वक्ते म्हणून डॉ. कृष्णाजी वैद्य, सहायक प्राध्यापक, रचना शरीर विभाग, एस. एन. व्ही. व्ही. एस. संचलित एस. व्ही. जी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बैलहोंगल यांना आमंत्रित केले होते.

विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया व जनजागृती या विषयांवर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्राचार्य, डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या प्रसंगी डॉ. कृष्णाजी वैद्य यांनी बहुमोल असे मार्गदर्शन करत असताना “अवयवदान म्हणजे मृत्यूनंतर किंवा जिवंत असताना आपल्या आरोग्यदायी अवयवांचे दान करून दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणे होय. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवे जीवन मिळू शकते.” असे विचार समाजामधे बिंबवून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रसंगी व्यासपिठावर इस्कॉनचे सेवेकरी मा. व्रजराज गोविंददास, या कार्यक्रमाचे को-ऑर्डिनेटर प्रा. सुनिल अत्तिमरद उपस्थित होते.
सदर सेमिनारचा लाभ कॉलेजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्योती तळगेरी यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *